व्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवड
schedule14 Jun 25 person by visibility 455 categoryराजकीय

व्हनाळी –युवराज राजिगरे-चुयेकर
व्हनाळी (ता.कागल) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजप पक्षाच्या माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या सौ.अश्विनी राजेंद्र जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप कडवे होते. निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून ग्रामसेवक संदीप कांबळे यांनी काम पाहिले. विद्यमान उपसरपंच ओंकार कौंदाडे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर अश्विनी जांभळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य संजय वाडकर,वर्षाराणी कांबळे,कविता वाडकर,इंदुबाई दंडवते, क्रांती वाकुडे,सुरेश मर्दाने,रंगराव पाटील,संजय निचिते,तानाजी सुतार,श्रीपती वाडकर,विलास कौंदाडे,शिवराम जाधव आदी उपस्थित होते. स्वागत अरूण पोवार यांनी केले आभार नामदेव गुरव यांनी मानले.