Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*

जाहिरात

 

डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या पांडे तिवारी यांची* *न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड*

schedule11 Jun 25 person by visibility 128 categoryशैक्षणिक


*न्यूकॅसल युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निवड*

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटर्डिसिप्लिनरी रिसर्चमधील  मेडिकल बायोटेक्नॉलॉजी आणि स्टेम सेल्स व रिजनरेटिव्ह मेडिसिन विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका  डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांना ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून व्हिजिटिंग अकॅडमिक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

   डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे आणि युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसलचे  लॉरिएट प्रा. अजयन् विनू यांच्या पुढाकारातून हा आंतरराष्ट्रीय संशोधन सहयोग (कोलॅबरेशन) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय प्रचार व संशोधनाला चालना मिळणार आहे.

डॉ. तिवारी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसलमध्ये ग्लोबल इनोव्हेटिव्ह सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड नॅनोमटेरियल्स (GICAN) मध्ये कार्यरत राहणार आहेत. नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अजयन् विनू हे या केंद्राचे नेतृत्व करत आहेत. 
या कोलॅबरेशनमुळे  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधन कार्याला तसेच डॉ. तिवारी यांच्या नॅनो बायोटेक्नोलॉजी, माफक खर्चामधील निदान व ट्रान्सलेशनल हेल्थकेअर या क्षेत्रातील योगदानाला अधिक चालना मिळणार आहे.

या निवडीबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे, विभाग प्रमुख डॉ. मेघनाद जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes