Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*मराठवाड्यात ‘गोकुळ’ ची दूध व दुग्धजन्य उत्पादने उपलब्ध करणार; नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :

जाहिरात

ट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

schedule13 Jun 25 person by visibility 308 categoryगुन्हे

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर शहरात दुचाकीवरून ट्रिपलसीट फिरणाऱ्या व एकेरी मार्गाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दोन दिवसीय विशेष मोहिमेत कडक कारवाई करण्यात आली आहे.
 
मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार, तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली १२ व १३ जून २०२५ रोजी ही मोहीम राबविण्यात आली.
 
या मोहिमेअंतर्गत:
 
१३७ ट्रिपलसीट दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करत १,३७,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
 
१०५ जणांनी एकेरी मार्गाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६५,५००/- रुपये दंड आकारण्यात आला.
 
एकूण २,०२,५००/- रुपयांचा दंड शहर वाहतूक शाखेकडून वसूल करण्यात आला.
 
 
शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित अधिकारी व अंमलदारांनी मोहिमेचे कार्य यशस्वीपणे पार पाडले.
 
शहरातील नागरिकांना वाहतूक शाखेचे आवाहन:
 
पावसाळी हवामान लक्षात घेता वाहने हळू व नियंत्रणात चालवावीत.
 
दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास टाळावा.
 
एकेरी मार्गाचे उल्लंघन करू नये.
 
वाहतुकीचे नियम पाळून दंडात्मक कारवाईपासून बचाव करावा.
 
 
शहर वाहतूक शाखेकडून अशा प्रकारच्या मोहीमा पुढील काळातही अधिक विस्तारित स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes