Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 303 विद्यार्थ्यांची* *आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड*सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन*

जाहिरात

 

गोकुळ’ मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

schedule02 May 25 person by visibility 264 categoryउद्योग

कोल्‍हापूर, ता.०१: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गोकुळ प्रकल्‍प, गोकुळ शिरगाव येथे १ मे कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 
यावेळी बोलताना कॉम्रेड उमेश सूर्यवंशी म्हणाले कि, महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या स्‍थापनेत व मुंबई शहराच्‍या जडण-घडणीमध्‍ये कामगारांनी अतुलनिय योगदान दिले आहे. गोकुळ दूध संघाने सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे. कामगारांनी त्यांचे कर्तव्य प्रामणिकपणे पार पाडून संस्था वाढीसाठी प्रयन्न करावे असे मत युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
 
 कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांच्या हस्ते युवा साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते कॉ.उमेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉ.संदेश पाटील यांनी केले तर आभार कॉ. शाहीर सदाशिव निकम यांनी मानले.
 
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक (खरेदी) मोळक, विभाग प्रमुख (स्टोअर) सुनिल कारंडे, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम, अध्यक्ष कॉ.मल्हार पाटील, कॉ.व्ही.डी.पाटील, कॉ.लक्ष्मण पाटील, कॉ.अशोक पुणेकर, कॉ.दत्ता बच्चे, कॉ.संदेश पाटील, कॉ.संभाजी शेलार, कॉ.लक्ष्मण आढाव, कॉ.योगेश चौगुले, कॉ.कृष्णा चौगुले व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी आदि उपस्थित होते.   

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes