सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न
schedule27 Aug 23 person by visibility 244 category
आवाज इंडिया
कोल्हापूर:
येथील सत्यशोधक अण्णाभाऊ साठे साहित्य विचार व संशोधन परिषद यांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जयंती व पुरस्कार वितरण समारंभ कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते मा. बळवंतराव माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. अर्चना जगतकर, संवाद प्रकाशनाचे प्रकाशक अनिल म्हमाने उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक व विचारवंत प्रा.डॉ. गिरीश मोरे होते.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते प्रा.डॉ.गिरीश मोरे म्हणाले, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक कलावंत होते. त्यांनी आपल्या साहित्यातून समग्र मानव मुक्तीचा विचार मांडलेला दिसून येतो. ते केवळ एका जातीपुरते, एका धर्मापुरते न लिहिता समग्र मानव समाज हा स्वतंत्र झाला पाहिजे. तो कुणाचाही गुलाम असता कामा नये, ही भूमिका घेऊन अण्णाभाऊंनी लिखाण केलेचे दिसते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, भारतीय स्वातंत्र्य चळवळ या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी सहभाग घेतलेला आहे.
लालबावटा कलापथकच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी समाज जागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊ, अमर शेख, गव्हाणकर यांच्या शाहिरीने विकसित होत गेलेली आहे. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊंच्या आयुष्यातील सर्वांग सुंदर असे कादंबरी आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार 2023 देऊन प्रा.डॉ. धनजय साठे, सोलापूर , प्रा.डॉ.एम.आर. खोत, सिंधुदुर्ग, मा.संजय चांदणे,अहमदनगर,मा.सुनील कोरे, हुपरी ,मा.सरोज फडके, कोल्हापूर,प्रा.रसूल सोलापूरे, गडहिंग्लज ,डॉ.शिल्पा जाधव, पुणे, मा. संदीप शेटे, नरंदे , मा.रमजान आत्तार, गडहिंग्लज , मा.सतीश मुणगेकर, रत्नागिरी, डॉ.विजय चांदणे, इस्लामपूर, मा.बळीराम रणदिवे, आटपाडी , मा.जयसिंग भाले, रांगोळी, मा.अशोक आळतेकर, आळते, प्रा.डॉ. कमल कांबळे, सोलापूर , डॉ.उत्तम सकट, कोल्हापूर ,मा.गोरक्ष सकटे, शाहूवाडी, प्रा.डॉ.स्मिता गिरी, कोल्हापूर ,प्रा.अरुणा सकटे, कोल्हापूर, मा. स्वालिया शिकलगार, कोल्हापूर , प्रा.डॉ.सर्जेराव पदमाकर,पेठ वडगांव, मा.शाहीर रणजित कांबळे, कोल्हापूर, मा.ज्योती कांबळे,शिरदवाड, मा. अरविंद घेवदे,शिराळा
मा. शाहीर सुरेश पाटील, बिळाशी या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ. अर्चना जगतकर, अनिल म्हमाने आदींनी मनोगते व्यक्त केली. लोकशाहीर रणजीत कांबळे यांनी माझी मैना ही छक्कड गाऊन कार्यक्रमाचे सुरुवात केली. त्याचबरोबर शाहीर सुरेश पाटील यांनी अण्णाभाऊ यांच्यावरील गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. अध्यक्षीय मनोगत मा. बळवंतराव माने यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अमोल महापुरे यांनी केले. तर आभार बबन पाटोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा नीलोफर मुजावर यांनी केले. यावेळी विश्वास कार्वेकर, प्रा. विश्वनाथ तराळ, जागतिक विक्रमवीर अन्वी घाटगे, प्रेम महापुरे, परशुराम चुयेकर, प्रा.डॉ.अमर कांबळे , दीपक लोंढे, सुशील कोल्हटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.