थेट पाईपलाईन योजनेचा पाणी पुरवठा सुरु
schedule29 Apr 25 person by visibility 28 categoryआरोग्य
काळम्मावाडी येथील व्हेरिबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचे काम रात्री 2 ला पूर्ण
कोल्हापूर ता.29 : शहराला पाणीपुरवठा करणारे थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी पंपिंग स्टेशन येथील व्हेरिबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह (VDF) सिस्टीमच्या सॉफ्टवेअरमध्ये गेले दोन दिवस बिघाड झालेने ते दुरुस्त करण्याचे काम महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर सुरू होते. या सॉफ्टवेअरचा फॉल्ट काढण्यात महापालिकेला यश आले असून व्हेरिबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हचे VFD चे खराब झालेले मटेरियल मुंबईवरून मागवन घेऊन एका दिवसात काम पुर्ण करण्यात आले आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर INU चे काम रात्रौ 2 ला पुर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी शहराला पाणी पुरवठा सुरु झाला असून आज कमी दाबाने व बुधवार पासून रेग्युलर पाणी पुरवठा होईल.
सदरच्या दुरुस्तीच्या कालावधीत शहराला 25 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे 4 टँकर व खाजगी 21 टँकर असे 25 टँकरद्वारे श्हराला आज पाणीपुरवठा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर पाणीपुरवठा योजने अंतर्गत ट्रान्सफॉर्मरचे कामही आजपासून सुरु करण्यात आले आहे.