Awaj India
Register
Breaking : bolt
इस्पुर्ली पोलिसांची मोठी कारवाई; नंदगावमध्ये छापाडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *एनबीए टीएर-१ (वाशिंग्टन ॲकॉर्ड) मानांकनकोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (KMRDA) स्थापना करा; 'S4A ग्रुप'चे राजू माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकाळमावाडी धरण दुर्घटना: प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच निष्पापांचे बळीमहिला व बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा* समिती उपसभापती दीपा ठाणेकरांची सह पालकमंत्र्यांकडे मागणी​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासाकोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफगोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,

जाहिरात

 

फॅशन सूत्रा'च्या माध्यमातून कोल्हापूरच्या दिव्या घाटगे यांचा यशस्वी झेप; ९ स्टॉलपासून सुरू झालेला प्रवास आता ६० पार!

schedule06 Mar 26 person by visibility 390 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर:
जिद्द, चिकाटी आणि सचोटीच्या जोरावर एखादा छोटा व्यवसाय किती उंचीवर जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या महिला उद्योजिका सौ. दिव्या प्रशांत घाटगे. २०२१ मध्ये अवघ्या ९ स्टॉलपासून सुरू केलेले 'फॅशन सूत्रा' (Fashion Sutra) हे दिवाळी प्रदर्शन आज ६० स्टॉलच्या भव्य टप्प्यावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, कोणतीही जाहिरात न करता केवळ 'माऊथ पब्लिसिटी'च्या जोरावर अवघ्या ८ दिवसांत सर्व स्टॉल फुल्ल होण्याचा विक्रम या प्रदर्शनाने प्रस्थापित केला आहे.
विश्वासाची कमाई आणि 'क्वालिटी' सेवा
दिव्या घाटगे यांनी 'फॅशन सूत्रा'च्या माध्यमातून स्टॉल धारकांमध्ये कमालीचा विश्वास निर्माण केला आहे. याच विश्वासामुळे आज कोल्हापूरसह बेळगाव, कराड, सांगली, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरांतून स्टॉल धारक आवर्जून येथे येतात. दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली आणि तेही वाजवी दरात उपलब्ध करून देणे, हे या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ग्राहकही वर्षभर या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात.
कुटुंबाची साथ आणि यशाचे सूत्र
या यशस्वी प्रवासात दिव्या यांना त्यांच्या मुलीची खंबीर साथ लाभते, तर पती आणि मुलगा यांचा पूर्ण पाठिंबा मिळतो. "आम्ही वर्षातून एकदाच प्रदर्शन करतो, पण ते अत्यंत दर्जेदार (Quality) असते," असे दिव्या घाटगे अभिमानाने सांगतात. स्टॉल धारकांचे समाधान आणि ग्राहकांची पसंती हीच त्यांच्या यशाची खरी पावती आहे.
भविष्यातील 'फॅशन सूत्रा'चे व्हिजन
कोल्हापुरातील महिला व्यावसायिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दिव्या घाटगे आता सज्ज झाल्या आहेत. आगामी काळात:
पुणे, मुंबई, सांगली आणि बेळगाव यांसारख्या शहरांमध्ये विविध सणांच्या निमित्ताने 'फॅशन सूत्रा'चा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.
यामुळे कोल्हापूरमधील लघू उद्योजक महिलांना आपला माल परराज्यात आणि मोठ्या शहरांत विकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
केवळ व्यवसायाचा विचार न करता, इतर महिलांनाही सोबत घेऊन प्रगती करणाऱ्या दिव्या घाटगे आज अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes