कागल येथे श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांना अभिवादन
schedule08 Jul 21 person by visibility 319 categoryसामाजिक

गोरख कांबळे (कागल) : कागल संस्थांनचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या जयंतीनिमित्त कागल येथे अभिवादन केले. कागल बसस्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना येथेही अभिवादन केले.प्रधान कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने व सचिन मगदूम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, नंदकुमार माळकर,बाबगोंडा पाटील, आदी उपस्थित होते.