सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी
schedule10 Aug 26 person by visibility 10 categoryराजकीय
कोल्हापूर
*छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याकरता उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची ..... सी पी आर हॉस्पिटल मधील गैरकारभार, बांधकामातील अनियमितता, चाळीस वर्षे सेवा देणाऱ्या सी.पी. आर आवारातील खोकेधारकांचे पुनर्वसन व मागासवर्गीय महामंडळाची व महिला बचत गटांची कर्ज माफी अशा विविध विषयावर भेट मिळण्याच्या मागणीवर प्रशासनाकडून अस्पष्टता आंदोलनासाठी कूच करताना टाऊन हॉल उद्यान येथे पोलीस प्रशासन व आंदोलन आमने-सामने भिडले!*
*यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे, रि पा इं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, रि पा इं (आंबेडकर) चे जिल्हा कार्याध्यक्ष बळवंत चव्हाण, शहर सचिव आकाश भालेकर, महिला आघाडी शहराध्यक्षा माया बिरांजे, जिल्हा सचिव प्रताप बाबर, जिल्हा संघटक दयानंद दाभाडे, शहर उपाध्यक्ष शैलेश सोनुले, शहर संघटक प्रशांत बिरांजे, राधानगरी तालुका संघटक उत्तम सुतार, दिव्यांग आघाडीचे महिपती खिलारे, महिला आघाडीच्या गीता सुतार, मिता माने (वळिवडेकर), पूनम बनसोडे, मनीषा माने, सुवर्णा परदेशी, काजल महापुरे, खोकीधारक फारूक उमर मुजावर, मुसा शेख, सर्जेराव कांबळे, सोबत मलिक चिकदूळ, विठ्ठल हरपवडेकर, बटू भामटेकर व इतर.*
*आंदोलनात कृतिशील पद्धतीने सहभागी होऊन खोकीधारकांना न्याय मिळेल पर्यंत आंदोलनाची धार तीव्र करण्याची घोषणा करणारे बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा वडगाव नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मा. शिवाजीराव आवळे (आण्णा) यांनी विशेष भूमिका पार पाडली. यावेळी बंडखोर सेना पक्षाचे पदाधिकारी मा. सुरेश आवळे, अभिषेक भंडारे, भालचंद्र दबडे, ओम सावंत.*