Awaj India
Register
Breaking : bolt
रिक्षाचालक असूनही समाजसेवेचा वसा जपणारा ‘आदर्श मावळा’ – सौरभ किरण खोतमावळा न्यूज 24 चे संपादक संग्राम धनाजी पाटील यांचे उल्लेखनीय समाजकार्यसंघर्षातून सेवेकडे : सौ. सोनाली घोडके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासमोफत शिक्षणातून वंचित विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे शिक्षक – श्री. सुनिल रत्नाकर चौगलेवंचितांचा एकच वादा : न्याय देणारा उत्तम दादा राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्यम्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्य

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :

schedule17 Jun 25 person by visibility 941 categoryउद्योग

*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :
*चेअरमन मच्छिंद्र नाळे यांची माहिती*
 
*कोल्हापूर :खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला अशी माहिती संस्थेचे चेअरमन मच्छिंद्र नाळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की पतसंस्थेचे संस्थापक भरत रसाळे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्था गेली तीस वर्ष कार्यरत आहे .संस्थेने चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे १०० कोटीच्या ठेवी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते . संस्थापक भरत रसाळे यांच्या पारदर्शी आणि काटकसरीच्या मार्गदर्शनामुळे आणि ठेवीदारांच्या विश्वासामुळे आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच संस्थेने हा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेने ठेवीदारांच्या ठेवीवर योग्य मोबदला व वेळेवर परतावा देऊन एक विश्वासार्हता निर्माण केली . त्यामुळे व्यवहार वाढून संस्थेस तीन कोटी पाच लाखाच्या वर नफा झाला आहे* .
*यावेळी बोलताना संस्थापक भरत रसाळे म्हणाले की, सुरवाती पासून स्वभांडवलावर संस्था चालवण्याचे ध्येय ठेवून शहर कार्यक्षेत्रात सुरु झालेल्या संस्थेने 5000 रुपया पासून ठेवीचा सुरू केलेला आपला प्रवास आज 100 कोटी पर्यंत नेऊन ठेवला आहे. संस्थेची उलाढाल रु.584कोटीच्या वर गेलेली आहे . तसेच संस्थेची स्वमालकीची २ कोटीची इमारत, राखीव निधी ३ कोटी ७५ लाखावरआहे .सभासद, ठेवीदार, हितचिंतक या सर्वांबरोबरच जनमानसात संस्थेने आपली एक विश्वासाहर्ता निर्माण केलेने १०० कोटी ठेवी जमा करण्याचे ध्येय साध्य झाले आहे . या सर्व गोष्टी सभासदांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्या आहेत. संस्था सध्या प्रत्येक सभासदास ४५ लाख कर्ज वाटपा बरोबर शंभर टक्के कर्ज वसुलीचे ध्येय ठेऊन उद्दिष्ट पूर्तीचे कार्य करत आहे.* "
*संस्थेच्या या यशामध्ये माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव, संचालक मंडळ व सल्लागार समिती सदस्य तसेच विद्यमान व्हा. चेअरमन श्री कृष्णात चौगले, मा. सचिव सौ. वर्षाराणी वायदंडे तसेच संचालक सर्वस्वी सूर्यकांत बरगे ,सर्जेराव नाईक, सौ.माधुरी घाटगे, शिवाजी सोनाळकर, साताप्पा कासार, वसंत पाटील ,राजेश कोंडेकर, महादेव डावरे, सौ.रोहिणी यडगे, अमित परीट, संतोष आयरे, राजेंद्र कोरे त्याचबरोबर सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार ,आप्पासाहेब वागरे ,पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर ,दशरथ कांबळे ,सौ. विद्या पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व कर्मचारी स्टाफ यांचे सहकार्य लाभले*
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes