आदिल फरास व उजळाईवाडी ग्रामस्थांमध्ये जागेवरून वाद
schedule06 Oct 23 person by visibility 721 categoryगुन्हे

कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
येथील माजी नगरसेवक आदिल फरास व उजळाईवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांच्यामध्ये जागेवरुन वाद निर्माण झाला. हायवे लगतच्या तीन गुंठे जागेवर फरास यांनी कंपाउंड मारलं. हे कंपाउंड मारत असताना ग्रामस्थांनी विरोध केला.
त्यामुळे काही काळ ग्रामस्थ, सरपंच आणि माजी नगरसेवक फरास यांच्यामध्ये वाद निर्माण झाला.
जे.आर. कॉलनी परिसरातील संबंधित जागा ग्रामपंचायतची आहे असा दावा ग्रामस्थांनी केला.तर ही जागा खरेदी केल्याचा दावा फरास यांनी केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं.
या घटनेवरून गावात बैठक घेण्यात आली. याबाबत सरपंच उत्तम आंबवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही जागा ग्रामपंचायतीची असल्याचं सांगितलं.याबाबत मोजणी सुद्धा आणणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. याबाबत सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे.माजी नगरसेवक फरास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणालेही जागा पठाण यांची आहे. त्यांच्याकडून मी एग्रीमेंट केलेले आहे. पठाण कंपाऊंड आपल्या जागेत मारत होते. ग्रामस्थांनी विनाकारण वाद केला.