डॉ. चंदा वानखडे यांना आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले पुरस्कार
schedule31 Mar 25 person by visibility 337 categoryशैक्षणिक

कोल्हापूर;
कृती फाउंडेशन यांच्यावतीने नागपूर येथील डॉ. चंदा वानखडे यांना यावर्षीच्या आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला. रविवारी (दि.6 एप्रिल) शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे साडेचार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
डॉ. वानखडे या नागपूर येथील आई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल पॅरामेडिकल कॉलेज नरसाळा व श्री हिरोमनी वानखडे बहुउद्देशीय संस्थेच्या त्या संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. दत्ता मेघे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल वाना डोंगरी नागपूर येथे त्या कार्यरत आहेत.
आतापर्यंत दरवर्षी दहा गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, यासह कॅन्सरगस्त रुग्णांना मोफत आहार, विधवा वंचित स्त्रियांना स्वावलंबी बनण्यासाठी त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे, शिक्षण बाह्य मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या कायम अग्रेसर असतात. दरवर्षी गरिबांना पुस्तके वह्या वाटप करत शैक्षणिक प्रचाराचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेले आहे. या कार्याबद्दल त्यांना नागपूर गौरव, प्रतिभावान पुरस्कार, उद्योजकता पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ता, गुणवंत विद्यार्थीनी आदी पुरस्काराने सुद्धा यापूर्वी गौरवण्यात आलेले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.