Awaj India
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन*घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर विचार होणे आवश्यक सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळालवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीजथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता*

जाहिरात

 

*डी वाय पाटील फार्मसीची विद्यार्थिनी* *राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेत अव्वल*

schedule04 Jan 24 person by visibility 1317 categoryक्रीडा



डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट व रिपकॉर्ड फार्मासिटीकल यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन पोस्टर व प्रश्नमंजुषा स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या सिमरन जे. पटवेगार हिने पोस्टर्स स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

    जयसिंगपूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सिमरन पटवेगर हिने पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सोनल जैन व आदनान ताम्हणकर यांच्या संघाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले तर मारिया बागवान आणि सिमरन पटवेगार यांच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

 महाविद्यालयाच्या नम्रता पाटील, तन्वी पोकळे व सुमैय्या बागवान या विद्यार्थिनी ही पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत उत्तम पोस्टरचे सादरीकरण केले. या सर्व विद्यार्थ्यांना डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. केतकी धने व प्राचार्य चंद्रप्रभू जंगमे यांचे मार्गदर्शन लाभले.


कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जयसिंगपूर: प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांकडून स्वीकारताना सिमरन पटवेगार.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes