Awaj India
Register
Breaking : bolt
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;गांधीनगरात सिंधी समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर*सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही गोकुळच्या मतदानास पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ लवकरच 'गोकुळ शॉप' होणार सुरू;उपवर्गीकरण ला विरोधच: डॉक्टर राजेंद्र गवई यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ लवकरच 'गोकुळ शॉप' होणार सुरू;

schedule17 Aug 26 person by visibility 48 categoryउद्योग

 जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या मागणीला यश

कोल्हापूर:

कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात नागरिकांची होणारी मोठी वर्दळ लक्षात घेता तेथे दुग्धपदार्थांची 'गोकुळ शॉप' सुरू करण्यात यावी, या जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. राजूभाऊ सूर्यवंशी (पाडोळी खुर्द) यांच्या मागणीला गोकुळ दूध संघाने (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

​राजूभाऊ सूर्यवंशी यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात गोकुळ दूध संघाकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्या पत्राची दखल घेत गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्र पाठवून जिल्हा परिषद परिसर क्षेत्रात एक्सक्लुझिव्ह (Exclusive) गोकुळ शॉप उभारणीसाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

  • गरज व प्राधान्य: जिल्हा परिषद कार्यालयातील लोकांची दररोजची गर्दी व वर्दळ पाहता येथे गोकुळचे दुग्धपदार्थ केंद्र असणे गरजेचे आहे. गोकुळला प्रथम प्राधान्य दिल्याबद्दल दूध संघाने श्री. सूर्यवंशी यांचे आभार मानले आहेत.
  • जागा निश्चिती: गोकुळ शॉपसाठी योग्य जागेची निश्चिती करून कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • पुढील प्रक्रिया: जागेची पाहणी व सर्व्हे गोकुळच्या कर्मचाऱ्यांमार्फत केला जाईल. तसेच, शॉप उभारणीसाठी लागणारे नियम, अटी व आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाईल.

​जिल्हा परिषद कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने राजूभाऊ सूर्यवंशी यांनी हा पुढाकार घेतला होता. आता प्रत्यक्ष जागेचा सर्व्हे होऊन लवकरच हे 'गोकुळ शॉप' नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes