Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड*कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*

जाहिरात

 

इचलकरंजीच्या दीपमाला तारळकर यांचे उल्लेखनीय कार्य

schedule06 Mar 26 person by visibility 412 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर :
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या इचलकरंजी येथील दीपमाला उर्फ राधिका तारळकर यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे
दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या राधिका तारळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. नुकताच 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान' प्रदान करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा (महिला ग्रामीण पूर्व) यांच्या वतीने ३१ मे २०२५ रोजी या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले
पुरस्कारांची गौरवशाली कारकीर्द
गेल्या काही वर्षांत त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत:
राज्यस्तरीय राजमाता जिजामाता पुरस्कार: औरंगाबाद (८ मार्च २०२०)
नारीशक्ती पुरस्कार: आनंदगंगा फाउंडेशन, कोल्हापूर (२०२१)
महिला उद्योजिका सन्मान: निर्मिती महिला मंच (२०२२)
आदर्श महिला पुरस्कार: पोलीस मित्र असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (२०२३)
इंटरनॅशनल मी उद्योजिका पुरस्कार: पेठवडगाव (२०२४)
तनिष्का सकाळ सन्मान: (८ मार्च २०२५)
केवळ व्यावसायिक यश न मिळवता, समाजात आदर्श महिला म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना विविध संस्था आणि मान्यवरांचे प्रोत्साहन लाभले आहे. "मिळालेले पुरस्कार ही जबाबदारीची जाणीव करून देणारी पावती आहे," अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes