Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसमाजसेविका सुनिता उदाळे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरफार्मासिस्ट पुनम कोरे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीर

जाहिरात

 

*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*

schedule21 Mar 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव (गडहिंग्लज) येथे आयोजित ‘हॅक फेस्ट-२६’ मध्ये डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्किटेक्चरल डिझाईन अँड मॉडेल मेकिंग’ स्पर्धेत विद्यार्थिनी तयार केलेला 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 
या स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयावर डिझाईन तयार करून त्याचे कार्यरत मॉडेल सादर करण्याचे आव्हान होते. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर संघाने ‘स्मार्ट बिल्डिंग’ या संकल्पनेवर आधारित ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉपचे अभिनव डिझाईन सादर केले.
 
या मॉडेलला उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघात स्वयंम सागर शितोळे, आस्तिक सिंग जाधोन, सुमित तुकाराम कदम व संकल्प राजेश खोत यांचा समावेश होता. 
 
या विद्यार्थ्यांना आर्किटेक्ट संतोष आळवेकर, आर्किटेक्ट तन्वी शेटके, आर्किटेक्ट इंद्रजीत जाधव व आर्किटेक्ट तेजस पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
संस्थेचे अध्यक्ष डॉ . संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील , विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार
डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख आर्कि. इंद्रजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes