Awaj India
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायममंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्धशिक्षकहिताचा मुद्दा केंद्रस्थानी; कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण

जाहिरात

 

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ*

schedule23 Mar 26 person by visibility 964 categoryलाइफस्टाइल

*
कोल्हापूर, दि. २० (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सन २०१८-१९ ते २०२५-२६ या कालावधीतील जिल्हास्तरीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. युवा पुरस्काराचे स्वरुप जिल्हा युवा पुरस्कार- जिल्हा स्तरावर एक युवक तसेच एक युवती एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. प्रति युवक व युवतींसाठी हा पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रु.१० हजार तर प्रति संस्थेसाठी गौरवपत्र,  सन्मान चिन्ह रोख रक्कम रु. ५० हजार अशा स्वरूपाचा असणार आहे.
 
युवक, युवतींसाठी पात्रतेचे निकष - अर्जदार युवक/युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी १३ वर्षे पूर्ण व ३१ मार्च रोजी ३५ वर्षे पर्यंत असावे. अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग ५ वर्ष वास्तव्य केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो तारखेसह माहिती सादर करणे आवश्यक राहील.
 
संस्थांसाठी पात्रता निकष-  संस्थानी केलेल्या कार्याचे उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व फोटो इ. तारखेसह माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील, अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट १९५० नुसार पंजीबध्द असावी.  अर्जदार व संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलिस स्टेशन) देणे आवश्यक राहील.
 
पुरस्कारासाठी मुल्यांकन - युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य पुरस्कार वर्षाच्या दि.१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील वर्षनिहाय गत तीन वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेण्यात येईल.
 
जिल्ह्यातील पात्र युवक, युवतींनी, संस्थेने आपला प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथे सादर करावा. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर तसेच संकेतस्थळावर sports.maharashtra.gov.in. उपलब्ध आहे. इच्छुकांनी  दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची कात्रणे, फोटो इ. च्या सत्यप्रती, तीन पासपोर्ट फोटो, चारित्र्याचा दाखला, पुरस्कार मिळाल्यानंतर दोन वर्ष कार्यरत राहण्याबाबत हमीपत्र जोडून बंद लिफाफ्यात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
0000

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes