Awaj India
Register
Breaking : bolt
बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे 3500 रोजगाराच्या संधी*घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्तआदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “कोल्हापूर थाळी”चे आयोजननगरसेवक आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा दानबाजार समितीच्या तीन संचालकांना 'कारण दाखवा' नोटीस; नातेवाईकांच्या नावे गाळा घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवारआरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भरकोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचालशिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमालीबुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रमगोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रक

जाहिरात

 

नगरसेवक आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा दान

schedule06 May 26 person by visibility 33 categoryराजकीय

कोल्हापूर :
राष्ट्रवादी गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष तथा कोल्हापूर महापालिका नगरसेवक आदिल फरास यांच्या ६ मे रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ५ मे रोजी पांजरपोळ येथे चारा दान उपक्रम राबविण्यात आला.
 
या उपक्रमातून मुक्या जनावरांच्या सेवेसाठी योगदान देत आदिल फरास यांच्या वाढदिवसाचे औचित्य समाजोपयोगी कार्याने साजरे करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
 
यावेळी नगरसेवक आदिल फरास रामेश्वर पतकी, युवराज साळोखे, सचिन लोहार, बजरंग देवकर, निरंजन पवार, शितल तिवडे, सोनाली कानविंदे, बाबू घाटगे, प्रसाद जमदग्नी, सचिन सावेकर, दिलीप टोणपे, राजेश चव्हाण, महेश टोपले, गब्बर मुल्ला, बाबू पांढरे, राऊत काका, शाहरुख तसेच माजी नगरसेवक सतीश लोळगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
 
आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, धार्मिक व जनहिताच्या विविध उपक्रमांची मालिका राबविण्यात येत असून, समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes