दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रम
schedule01 Oct 26 person by visibility 45 categoryक्रीडा
; १५ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळावी आणि त्यांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात आला.
स्पोर्ट्स सेंटरचे ओनर सचित गांधी व व्यवस्थापिका मयुरी पाठक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील १५ दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलच्या सरावासाठी स्पोर्ट्स सेंटरच्या पिकलबॉल डोममध्ये मोफत कोर्टची सुविधा उपलब्ध करून दिली. हा उपक्रम केवळ मदतीपुरता मर्यादित नसून दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिले दिव्यांग पॅरा पिकलबॉल सराव शिबिर असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या १५ दिव्यांग खेळाडूंनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबिरात पॅरा पिकलबॉलचे नियम, तंत्र आणि सरावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रथमच हा खेळ खेळण्याची संधी मिळाल्याने खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आणि आनंद दिसून आला.
यापूर्वीही पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी, कोल्हापूरच्या दिव्यांग खेळाडूंना स्पोर्ट्स सेंटरकडून क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यातही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन सचित गांधी यांनी दिले.
यावेळी पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष संतोष रांगणे यांनी स्पोर्ट्स सेंटरच्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. अशा प्रकारे सरावासाठी सुविधा व संधी मिळाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर या खेळातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सराव शिबिरामुळे दिव्यांग खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, उत्साह आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण झाली. दिव्यांग खेळाडूंना केवळ मदतीची नव्हे, तर संधी, सुविधा आणि समान व्यासपीठाची गरज आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
या शिबिरास विष्णुपंत पाटील, जानकी मोकाशी, कांचन चौगुले, विकास चौगुले, सचिन घाटगे, किशोर तावडे, सुप्रिया तावडे, प्रथम इंगळे यांच्यासह इतर मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.