Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड*कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*

जाहिरात

 

*डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर* *वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव*

schedule19 Feb 26 person by visibility 392 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर, तळसंदे व आकुर्डीचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ६२ वा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी मोठी केली  होती. 

   शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. संजय डी. पाटील आणि  त्यांच्या स्नुषा डी. वाय. पाटील ग्रुपच्या अॅडव्हायझर सौ. पूजा ऋतुराज पाटील या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस असल्याने कुटुंबीयांकडून वाढदिवस एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोघानाही माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी वाय. पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांनी डॉ. संजय डी. पाटील आणि   सौ. पूजा ऋतुराज पाटील  यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी सौ. वैजयंती संजय पाटील,  माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील,  देवश्री सतेज पाटील, सत्यजित पाटील बेनाडीकर, अभिजित पाटील बेनाडीकर,  अर्जुन व आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

   डॉ. संजय डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी आणि कदमवाडी येथील मेडिकल कॉलेज सभागृहात उपस्थिती लावली. यामध्ये माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, देवराज पाटील, माजी कुलगुरू डॉ. पी
 बी. साबळे, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. ए. एन. जाधव,  उद्योजक संजय घोडावत,  दिलीप मोहिते, आनंद माने, प्रताप उर्फ भैय्या माने, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. मंजिरी मोरे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रताप पाटील, डॉ. सचिन पवार, डॉ. संदीप पाटील, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र घाटगे, सोहन शिरगावकर,  *गोकुळ संचालक अजित नरके,  बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले यांच्यासह संचालक* दौलत देसाई, क्रीडाईचे अजय डोईजड, राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह कोल्हापूर महानगर पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, कॉंग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, श्रीराम सोसायटीचे उपसभापती सुभाष गदगडे व सर्व आजी माजी संचालक, शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी, महालक्ष्मी मंदिर कर्मचारी, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप पाटील व संचालक,  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. व्ही. व्ही. भोसले, आकुर्डी येथील डी. वाय. पाटील  कॅम्पसचे डायरेरेक्टर अमित विक्रम व  प्राचार्य,  सी.एच.आर. ओ. श्रीलेखा साटम, सीए. अमित गावडे, ऍड अजित पाटील, ऍड अभिषेक मिठारी यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विविध प्रसारमाध्यमांचे संपादक, अधिकारी,  पत्रकार, शिक्षण, सहकार, राजकीय, सामाजिक व औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे डॉ. पाटील व सौ. पूजा पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

*दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन*
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेडिकल कॉलेजच्यावतीने दुर्मिळ माहिती संग्रह प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले कोल्हापूरमधील विविध ठिकाणे, वैशिष्ट्ये याची माहिती देणारी कात्रणे मांडण्यात आली होती.

*

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes