Awaj India
Register
Breaking : bolt
ऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया सर्व वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील : अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोतकोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटील

जाहिरात

 

​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल

schedule30 May 26 person by visibility 626 categoryगुन्हे

 

​चुये / प्रतिनिधी :

जिल्ह्यातील अवैध दारू धंदे आणि व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक सो, कोल्हापूर व अपर पोलीस अधीक्षक सो, उपविभागीय पोलीस अधिकारी सो (करवीर विभाग, कोल्हापूर) यांनी दिले आहेत. या आदेशानुसार इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या वतीने अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

​या मोहिमेतर्गत इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निगवे खालसा (ता. करवीर) येथील ओढ्यावर सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३०,००० रुपये किमतीचे ६०० लिटर दारूचे कच्चे रसायन घटनास्थळीच नष्ट केले, तसेच दारूच्या भट्ट्या व इतर साहित्यही पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.

संशयित आरोपींवर गुन्हा दाखल

​याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ कलम ६५ (फ) प्रमाणे कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१) गणेश जगदीश माटुंगे

२) अतिश दिलीप बागडी

३) रविंद्र जगदीश माटुंगे (सर्व रा. निगवे खालसा, ता. करवीर)

कारवाई करणारे पोलीस पथक

​सदरची यशस्वी छापा कारवाई इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश मेटील, पोलीस हवालदार प्रविण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाटील, होमगार्ड अनिकेत कुंभार तसेच पोलीस पाटील जयदीप किल्लेदारसुशांत तांबेकर यांच्या पथकाने केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes