Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया सर्व वैद्यकीय पथके २४ तास कार्यरत राहतील : अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोतकोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटीलचुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ

जाहिरात

 

महिलांच्या आरोग्य आणि सोशल मीडिया

schedule07 Jul 26 person by visibility 32 categoryआरोग्यसामाजिक

             *महिलांचे आरोग्य आणि सोशल मीडिया*

 'आरोग्यम् धनसंपदा' म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे. सध्याच्या काळामध्ये महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थिती ही उत्तम स्वरूपाची आहे.  प्रत्येक क्षेत्रामध्ये खाजगीकरण असल्यामुळे स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे. आठ तास काम केले तरीही घरी गेल्यानंतर ही काही तास काम करावे लागते. घरामध्ये सुद्धा भरपूर कामे असतात ते कामे करता करता महिलांच्या नाकी नऊ,येते त्यातून त्यांना सोशल मीडियाचाही वापर भरपूर करायचा असतो. त्यामुळे त्या रात्री अपरात्री जागरण करतात, सकस आहार घेण्याकडे ही त्यांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते, झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांचा  चिडचिडपणा शिगेला पोचतो.
 त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या कौटुंबिक जीवनावर होताना दिसून येत आहे. परिणामी बऱ्याच महिला ह्या विविध आजाराने ग्रासत झालेले आहेत.  अगदी कमी वयामध्ये चित्र विचित्र रोगाची लागण होत आहे. त्यामध्ये अनामिया हिमोग्लोबिनची कमतरता, विटामिन डी, विटामिन बी 12 असे विविध छोटे छोटे आजार आपणास सांगता येतील. बरेच महिलांना सोशल मीडियाचे एडिक्शन  झाले आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर,कुटुंबावर आणि कामावर होताना दिसत आहे. म्हणून महिलांना ट्रेस मॅनेजमेंट, वर्क मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट, ब्रेन मॅनेजमेंट याची नितांत  गरज आहे,

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes