Awaj India
Register
Breaking : bolt
नामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजारसाहेब .... एकच नंबर काम !वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चौदा गाढवांना ताब्यात ६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन –कोल्हापूरवासीयांना आणखीन चार प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दौलत साखर कारखान्यात त्रिपक्षीय वेतन करार लागू करा; नस्ती महानगरपालिकेतून खाजगी ठिकाणी नेणाऱ्यांवर फौजदारी करा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;

जाहिरात

 

वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चौदा गाढवांना ताब्यात

schedule23 Aug 26 person by visibility 34 categoryराजकीय

कोल्हापूर : रंकाळा परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर भटक्या जनावरांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रंकाळा परिसरात भटकणारी १४ गाढवे जप्त करण्यात आली.

फुलेवाडी मार्गे दत्त मंगल कार्यालयाच्या बाजूने ही गाढवे रंकाळा परिसरात दाखल झाली होती. रस्त्यावर मोठ्या संख्येने गाढवे भटकत असल्याने वाहनधारक तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिक तसेच नगरसेवकांकडून महापालिकेकडे वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई केली. विशेष मोहिमेदरम्यान सर्व १४ भटकी गाढवे जप्त करण्यात आली.

ही कारवाई आरोग्य निरीक्षक अनिकेत बावडेकर, ऋषिकेश सरनाईक व गीता लखन आरोग्य विभागातील मुकादम, कर्मचारी व ॲनिमल कॅचर यांच्या पथकाने केली.

महापालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सार्वजनिक ठिकाणी भटक्या जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीला निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू ठेवण्यात येणार आहेत.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes