Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गतीगोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड*दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादनजागतिक आय.व्ही.एफ. दिनानिमित्त विशेष: पत्की हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या छायेतून उमलले नवजीवन!करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!

schedule29 Jul 26 person by visibility 110 categoryराजकीय

 
कोल्हापूर : 
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिले होते. त्याची मुदत दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून देखील शासनाने अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नाही. शासन जाणीवपूर्वक गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात होते त्यामुळे पुंगाव तालुका राधानगरी येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्था यांनी माननीय उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी झाली असून त्या कामी न्यायमूर्ती मिलिंद जाधव व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांचे खंडपीठाने सदर याचिकेची दखल घेऊन मा. सर्वोच्च न्यायालय यांचे गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश असताना देखील शासनाने कच्ची मतदार यादी देखील अद्याप प्रसिद्ध न केल्याने नाराजी व्यक्त केली व शासनास व दुग्ध विभागास गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. सदर निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू न केल्यास मा. सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाचा अवमान केल्याबद्दल संबंधितांवर कायद्यातील तरतुदी अन्वये योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश दिले. सदर संस्थेचे वतीने ज्येष्ठविधीज्ञ श्रीनिवास पटवर्धन व एडवोकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली.गोकुळ दूध संघाच्या सुनावणीमध्ये सरकार पक्षाच्या वतीने ॲड. श्रीमती तेजस कापरे यांनी काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes