Awaj India
Register
Breaking : bolt
चुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;

जाहिरात

 

कोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ

schedule03 Jul 26 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर : विवाह इच्छुक युवक-युवती तसेच त्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रा. उज्ज्वला अर्जुन देसाई यांच्या पुढाकारातून 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र' सुरू करण्यात आले आहे. "विश्वासासह नात्याची सुंदर सुरुवात" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून योग्य वधू-वरांचा शोध सुलभ, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात योग्य जोडीदार शोधणे अनेक कुटुंबांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. ही गरज लक्षात घेऊन पंचशील वधू-वर सूचक केंद्रामार्फत विविध समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींची नोंदणी करून त्यांना योग्य स्थळे उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे. गोपनीयता, विश्वास आणि पारदर्शकतेला प्राधान्य देत प्रत्येक कुटुंबाला योग्य मार्गदर्शनही केले जाणार असल्याची माहिती केंद्राच्या वतीने देण्यात आली.
विवाहासाठी इच्छुक युवक-युवती व पालकांनी केंद्राशी संपर्क साधून नोंदणी करावी, तसेच आवश्यक कागदपत्रांसह माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता :
द्वारा – एक्सप्रेस पब्लिशिंग हाऊस,
एम-४, 'रॉयल नेस्ट' वृशाली सर्कल
(हनुमान मंदिर शेजारी), ताराबाई पार्क,
कोल्हापूर – ४१६००३
संपर्क :
📞 9763559048
📞 9822519688

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes