Awaj India
Register
Breaking : bolt
गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवास्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करानामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजार

जाहिरात

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवा

schedule24 Aug 26 person by visibility 37 categoryराजकीय


जि. प. सदस्या शोभा बेलेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

कळे, ता. पन्हाळा : हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण असलेल्या श्री गणेश चतुर्थी उत्सवाला काही दिवसांचा अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गांवर पडलेले मोठमोठे खड्डे तात्काळ बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. शोभा युवराज बेलेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळे हे परिसरातील प्रमुख बाजारपेठ असून गणेशोत्सवादरम्यान परिसरातील विविध गावांमधून भाविक व गणेश तरुण मंडळांचे कार्यकर्ते गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कळे येथे येतात. कळे गावातील 'देसाई गल्ली ते माणिक हॉल' तसेच 'हरिनारायण हॉल, पुनाळा फाटा ते पुनाळ खिंड' हे गणेशमूर्ती ने-आण करण्याचे प्रमुख मार्ग आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालक, नागरिक व भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती नेताना अडचणी निर्माण होण्यासोबतच अपघाताची शक्यताही वाढली आहे.
गणेशोत्सवाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच भाविक व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कळे येथील दोन्ही प्रमुख मार्गांवरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी नम्र मागणी सौ. शोभा युवराज बेलेकर यांनी उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग पन्हाळा यांच्याकडे केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes