Awaj India
Register
Breaking : bolt
तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;

जाहिरात

 

रिक्षाचालक असूनही समाजसेवेचा वसा जपणारा ‘आदर्श मावळा’ – सौरभ किरण खोत

schedule06 Feb 26 person by visibility 1010 categoryउद्योग

कोल्हापूर | प्रतिनिधी
शिव–जिजाऊंच्या विचारांना स्मरून समाजसेवेला जीवनधर्म मानणारे सौरभ किरण खोत हे आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. कष्टकरी पार्श्वभूमीतून आलेले आणि रिक्षा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे सौरभ खोत हे कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
सध्या ते संपर्कप्रमुख, हातकणंगले लोकसभा छत्रपती ग्रुप, महाराष्ट्र राज्य या पदावर कार्यरत असून, सामान्य माणसाच्या अडचणींची जवळून जाण असलेल्या या रिक्षाचालकाने आपल्या मर्यादित उत्पन्नातूनही समाजासाठी भरीव योगदान दिले आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी सौरभ खोत यांच्या पुढाकारातून आणि आशा–धन्वंतरी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने भव्य मोफत नेत्ररोग व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. रिक्षा व्यवसायातील धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. या शिबिराचा लाभ शेकडो सर्वसामान्य नागरिकांना झाला.
यासोबतच हुपरी येथील कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा परिचय व्हावा, या उद्देशाने ‘छावा’ हा चित्रपट मोफत दाखवण्याचा उपक्रमही त्यांनी राबवला. इतिहासाची ज्वाला नव्या पिढीमध्ये प्रज्वलित करण्याचा हा प्रयत्न उपस्थितांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.
विशेष म्हणजे, कोणताही निवडणूक हेतू, प्रसिद्धीची अपेक्षा किंवा राजकीय लाभ न ठेवता रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा समाजकार्यासाठी खर्च करणे, हीच त्यांची कार्यपद्धती आहे.
“शून्यातून विश्व उभं करणाऱ्या शिवरायांच्या विचारांचा पाईक म्हणून, सामान्य रिक्षाचालक असूनही समाजासाठी काहीतरी देणं ही माझी जबाबदारी आहे,” असे सौरभ खोत सांगतात.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes