Awaj India
Register
Breaking : bolt
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन*घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर विचार होणे आवश्यक सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळालवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज

जाहिरात

 

मावळा न्यूज 24 चे संपादक संग्राम धनाजी पाटील यांचे उल्लेखनीय समाजकार्य

schedule05 Feb 26 person by visibility 801 categoryसंपादकीय


कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील गणेश कॉलनी, साने गुरुजी वसाहत येथील रहिवासी संग्राम धनाजी पाटील हे पत्रकारिता आणि समाजकार्य या दोन्ही क्षेत्रांत गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत. मावळा न्यूज 24 या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत.
पत्रकारितेबरोबरच समाजकार्याची विशेष आवड असलेल्या संग्राम पाटील यांनी महिलांसाठी विविध शासकीय योजना, स्पर्धा, प्रबोधनात्मक उपक्रम राबवून त्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोलाचे काम केले आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने त्यांनी राबवलेले उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवणारे ठरत आहेत.
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना, राजे फाउंडेशन आणि मावळा फाउंडेशन या माध्यमातून त्यांनी गोरगरीब व गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यामध्ये गरजू कुटुंबांना कपड्यांचे वाटप, तसेच विविध रुग्णालयांमधील रुग्णांना फळांचे वितरण अशा संवेदनशील उपक्रमांचा समावेश आहे. या कामामुळे अनेक गरिबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.
समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करत असताना कोणत्याही प्रसिद्धीचा आग्रह न धरता, निरपेक्ष भावनेने सेवा देणे हीच त्यांची ओळख बनली आहे. “समाजासाठी काहीतरी देणं, हाच खरा पत्रकारितेचा धर्म आहे,” अशी भूमिका संग्राम पाटील वेळोवेळी व्यक्त करतात.
त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याबद्दल विविध स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही मावळा न्यूज 24 च्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes