Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे दातृत्व; गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कर्तुत्व

schedule13 Jun 25 person by visibility 524 categoryराजकीय

हवे वाचन अन योगासने..सुंदर बनवूया जगणे...
सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे उद्या वाटप 
 
*कोल्हापूर :* नेत्याचा वाढदिवस म्हणजे हारतुरे अन फेट्यामध्ये न ठेवता त्याला विधायक रुप देऊन काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्या जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना देत त्यांचे जगणे सुंदर बनवले आहे. आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे उद्या शनिवारी ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनात सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लाईक फाॅर लाईक या टॅगलाईनखाली राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात वाचन, योगासन, निसर्ग मैत्री आणि छंद याद्वारे आपले जगणे सुंदर बनवूया अशी साद घालण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला २००७ पासून वह्यांचे संकलन केले जाते. विशेष म्हणजे ६४ लाख ३७ हजार वह्या २०२४ पर्यंत जमा झाल्या होत्या. या वह्या १४ लाख ५३ हजार ९६५ विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. या सामाजिक बांधिलकीची २०१४ मध्ये लिम्का बुक ऑफ रॅकॉर्डसमध्ये नोंद झाली. तर २०१६ मध्ये वर्ल्ड रेकॉर्डस इंडियानेही याची दखल घेतली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes