Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका

जाहिरात

 

आदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने

schedule29 Nov 25 person by visibility 145 categoryशैक्षणिक

 
पिंपळदरा (वाशीम) : जि. प. प्राथमिक शाळा, पिंपळदरा येथील मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने सर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांच्याबद्दल ग्रामस्थ आणि परिसरात मोठी प्रशंसा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी राबविलेले नवनवीन उपक्रम, डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर आणि समाजाभिमुख कार्यामुळे सोनोने सरांचा महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारासाठी जोरदार चर्चेत उल्लेख केला जात आहे.
 
सोनोने सरांनी गेल्या २५ वर्षांच्या अध्यापन काळात आणि २१ वर्षांच्या सेवेत अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक तसेच सांस्कृतिक पातळीवर सकारात्मक बदल घडवले. शाळेत त्यांनी वाचन-लेखन प्रकल्प, पालक संपर्क अभियान, तसेच डिजिटल शैक्षणिक साधनांचा वापर करून शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक, बौद्धिक आणि सामाजिक क्षमतावृद्धीसाठी त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत सोनोने सर दिव्यांग विद्यार्थ्यांना सातत्याने मदत व मार्गदर्शन करतात. कोरोना काळात त्यांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला तर रक्तदान, महिला दिन, स्त्री-पुरुष समानता यासारख्या सामाजिक जनजागृती उपक्रमांनाही त्यांनी गती दिली. विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवा रुजवण्यासाठी त्यांनी विविध प्रेक्षणीय स्थळांना शैक्षणिक भेटी आयोजित केल्या.
 
वाचन, अभिनय, नाटिका, समजप्रबोधन आणि समाजकार्य ही त्यांची आवड असल्याने त्यांच्या अध्यापनात कलात्मकता आणि प्रभावी संवादशैली दिसून येते. त्यामुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात.
 
परिसरातील शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्यातून असा सूर उमटतो की, “सोनोने सरांचे कार्य हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आदर्श उदाहरण असून ते महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारासाठी पाहिजे तेवढे पात्र आहेत.”
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes