Awaj India
Register
Breaking : bolt
मावळा न्यूज 24 चे संपादक संग्राम धनाजी पाटील यांचे उल्लेखनीय समाजकार्यसंघर्षातून सेवेकडे : सौ. सोनाली घोडके यांचा प्रेरणादायी जीवनप्रवासमोफत शिक्षणातून वंचित विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे शिक्षक – श्री. सुनिल रत्नाकर चौगलेवंचितांचा एकच वादा : न्याय देणारा उत्तम दादा राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्यम्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्यबहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडे

जाहिरात

 

डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट

schedule02 Dec 25 person by visibility 542 categoryशैक्षणिक

कोल्हापूर – 
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाला मिळलेले हे 58 वे पेटंट आहे. 
 
प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती थोरात, सूरज संकपाळ व डॉ. अभिषेक लोखंडे यांनी हे संशोधन केले. ‘आरजीओ निकेल कोबाल्ट बेस्ड हाय एनर्जी डेन्सिटी अ‍सिमेट्रिक इलेक्ट्रोकेमिकल सुपरकॅपेसिटर डिव्हाइस’ या संशोधनामुळे ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले आहे.
 
ऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी व सुपरकॅपेसिटर डिव्हाइस विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. केमिकल बाथ डिपॉझिशन मेथड या सोप्या व कमी खर्चिक प्रक्रियेद्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. 
 
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes