Awaj India
Register
Breaking : bolt
राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्यम्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्यबहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडेआदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीयस्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीकसेवेचा व संवेदनशीलतेचा समतोल : सुमेधा प्रभू इंगळे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समर्पित कार्य : संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि दक्षिना स्कूलचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्य

schedule28 Jan 26 person by visibility 70 categoryशैक्षणिक

कोल्हापूर :
म्हासुर्ली (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील अंगणवाडी क्र. 159 येथील सेविका सौ. शुभांगी शिवाजी पाटील यांनी विविध सामाजिक व शासकीय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.  ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केलेल्या सौ. पाटील यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून बालविकासात मोलाची भूमिका बजावली आहे.
मेंदूचा विकास उपक्रम अंतर्गत त्यांनी मेंदूमध्ये असणारी गुंतागुंतीची रचना समजावून सांगत लहान बालकांचा मेंदूचा विकास कसा साधता येईल, याचे प्रत्यक्ष कृतीतून प्रभावी सादरीकरण करून दाखवले. या उपक्रमामुळे पालक व बालकांमध्ये शिकण्याविषयी जागरूकता वाढली आहे.
कोरोना काळात त्यांनी कोरोना फायटर म्हणून सर्व्हेचे काम पार पाडत प्रशासनाला मोलाची मदत केली. तसेच BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून कामकाज करताना मतदान जनजागृती कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण केली. याशिवाय पोलिओ लसीकरण मोहिमेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शैक्षणिक पात्रता, सामाजिक बांधिलकी आणि कार्यातील तत्परता यांचा संगम असलेल्या सौ. शुभांगी शिवाजी पाटील यांचे कार्य हे अंगणवाडी सेविकांसाठी प्रेरणादायी ठरते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes