Awaj India
Register
Breaking : bolt
*डॉ.झांबरे, प्रा.सौ.पाटील व डॉ.वाटेगांवकर यांच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंट**पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दीशिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली : राज ठाकरे कुलगुरू यांनी घेतले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनमाजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा* *‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान*गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गतीगोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!

जाहिरात

 

कुलगुरू यांनी घेतले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

schedule05 Aug 26 person by visibility 48 categoryराजकीय

कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: ज्येष्ठ शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आज सकाळी कसबा बावडा येथील ‘यशवंत निवास’ येथे जाऊन कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत डॉ. पाटील यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर कुलगुरू डॉ. कामत, प्र-कुलगुरू डॉ. जाधव आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील तसेच पाटील परिवारातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes