Awaj India
Register
Breaking : bolt
भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजनअध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणीकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहनगोकुळमध्ये प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना विरोधजय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडेर ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्लीचा स्तुत्य उपक्रम

जाहिरात

 

भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरला

schedule19 Nov 26 person by visibility 31 categoryसामाजिक

छत्रपती संभाजीनगर, दि. १४ : भारतीय कर्मचारी संघ (BKS) आणि भारतीय स्वाभिमानी संघ (BSS) तसेच विविध सहयोगी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत राजयोग मंगल कार्यालय, चिनार गार्डन, पडेंगाव येथे हे संमेलन होणार आहे.
या राज्य संमेलनाचे उद्घाटन खासदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शिक्षण राज्यप्रमुख ॲड. राहुल मखरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण असणार आहेत. भारतीय कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. ओहोळ, भारतीय स्वाभिमानी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. एन. रेकवाल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
संविधान, लोकशाही आणि आरक्षणावर विचारमंथन
या संमेलनात संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय, शिक्षण, आरक्षण आणि कामगारांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा होणार आहे. उद्घाटन सत्रात SIR प्रक्रिया, डिलिमिटेशन बिल आणि EVM मशीनमधील कथित घोटाळे या विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तसेच जातीनिहाय जनगणनेतूनच आरक्षणाचे प्रश्न सोडवणे शक्य आहे का, बहुजनांचे पक्ष फोडण्यामागील RSS-BJP ची भूमिका यावरही विचारमंथन होणार आहे.
दुपारच्या सत्रात पेपरफुटी, विद्यार्थी आत्महत्या, सरकारी शाळांचे खासगीकरण, मुस्लिमांबाबत देशांतर्गत आणि परदेशातील भूमिका, आरएसएसची दुहेरी भूमिका तसेच बहुजन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ट्रेड युनियनची आवश्यकता या विषयांवर चर्चा होणार आहे.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊंचे विचार पुढे नेण्याचा संकल्प
शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या विचारांना पुढे नेण्याचा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून कर्मचारी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाही अधिक बळकट करणे, सामाजिक न्याय आणि संघटित चळवळीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या संमेलनाला महाराष्ट्रातील नागरिक, कर्मचारी, कामगार, युवक, महिला आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes