कोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार
schedule01 Oct 26 person by visibility 67 categoryक्रीडा
कोल्हापूर, ता. 1 - पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या आजरीज इको व्हॅली येथे रविवारी (ता. ४) 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जीपच्या (4X4) ऑफ रोडिंग स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती डॉ. नचिकेत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.
ते म्हणाले, पश्चिम घाटापैकी महत्त्वाच्या असलेल्या गगनबावडा-वेसरफ येथे निसर्गाशी एकरुप होऊन, निसर्गाला हानी न पोहोचवता आजरीज इको व्हॅलीची उभारणी केली आहे. या पर्यटन केंद्राला पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे. स्पर्धेचे नियोजन 4X4 कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू अश्विन शिंदे करत असून ते म्हणाले, रविवारी एक दिवस होणाऱ्या (4X4) ऑफ रोडिंग फॅमिली इव्हेंटमध्ये एकूण 200 लोक सहभागी होतील. यामध्ये ग्रुप ड्राईव्ह, ट्रायल ड्राईव्ह, फॅमिली ड्राईव्ह झाल्यानंतर टाईम ट्रायल ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, नाशिक, गोवा, कर्नाटक येथील स्पर्धक सहभागी होणार आहेत. सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकरिता शिवाजीराव मोहिते आणि रोड टू लंडन ही सेल्फ ड्राईव्ह मोहीम पूर्ण केलेले हेमंत शहा, तसेच बरेच अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामांकित ऑफ रोडरही उपस्थित राहणार आहेत. पर्यटन, स्थानिकांना प्रोत्साहन आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व मदत अशा दुहेरी हेतूने होणाऱ्या या स्पर्धा होतील. विजेत्यांना मेडल, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात येणार आहे.
दरम्यान, यावेळी स्पर्धेचे टी शर्टचे अनावरण चितेश मुंडोडी, डॉ. नचिकेत पाटील, ऑफ-रोडर अश्विन शिंदे, कुणाल धुम्मा, दिग्विजय लोगळे, राकेश जाधव आणि बाईक रायडर प्रशांत काशीद आदींच्या उपस्थित करण्यात आले.
फोटो ओळ – गगनबावडा येथे रविवारी होणाऱ्या ऑफ रोड स्पर्धेचे टी शर्ट अनावरणप्रसंगी चितेश मुंडोडी, अश्विन शिंदे व इतर मान्यवर.