यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न
schedule14 Aug 26 person by visibility 126 categoryशैक्षणिक
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर:
यशवंतराव चव्हाण ( के एम सी) कॉलेज, भूगोल विभाग,
च्या वतीने एल निनो आणि मान्सून या विषयांवर भित्तीपत्रकाचे आणि आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळेचे आयोजन दि 13 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर यांच्या हस्ते भितीपत्रकाचे उद्घाटन झाले. डॉ प्रशांत नागावकर यांनी संशोधन महत्त्वाचे असून विविध विषयांवर संशोधन प्रकल्प करावेत असे आवाहन या निमित्ताने केले. भूगोल विभाग प्रमुख डाॅ. जे. एम. शिवणकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व भूगोल विभागातील उपक्रमाची माहिती दिली. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. युवराज मोटे यांनी आविष्कार संशोधन प्रकल्प , विषय निवड यांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत प्रा. एस एम शेख यांनी व्यक्त केले. तसेच दर्जेदार संशोधन होणे काळाची गरज आहे असा विचार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रा अश्विनी मुरावणे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. आर आर मांगले, प्रा. पी. डी. तोरसकर, प्रा ए. डी. मुडे , डॉ संजय कांबळे, डॉ किरण भोसले, डाॅ बी. एम. पाटील, डॉ सचिन धुर्वे महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.