अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटप
schedule23 Oct 26 person by visibility 23 category
आठ हजार पाण्याच्या बाटल्या अशा पद्धतीने उपवासाच्या पदार्थांचे वाटप.
श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सात हजाराहून अधिक भाविकानी घेतला लाभ
जुना राजवाडा परिसरात झाला उपक्रम
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) - देशातल्या साडे तीन शक्ती पी ठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या शारदिय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, उद्योजक राहूल सुनीता राजेंद्र पालांडे , अमेरिकेतील उद्योजिका सौं स्नेहल शहाजी आर्किले,
विराज साधना वसंत महाडिक आणि पुण्यातील उद्योजिका डॉ.रूपा शिरसाठ यांच्या वतीने अंबाबाई देवीच्या भक्तांसाठी उपवासाचे पदार्थ आणि फळे वाटप उपक्रम राबवण्यात आला. तब्बल चारशे किलो शाबू - बटाटा खिचडी, एक टन केळी, शंभर किलो बटाटा वेफर्स, तब्बल आठ हजार पाण्याच्या बाटल्या आणि चार हजार राजगिरा लाडू वाटप झालेला अलीकडच्या काळातील कोल्हापुरातला हा पहिलाच उपक्रम ठरला.
जुना राजवाडा परिसरात श्रीमंत सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते नवरात्राच्या सातव्या माळेचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तब्बल सात हजाराहून अधिक अंबाबाईच्या भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
या उपक्रमासाठी कु राहूल सुनीता राजेंद्र सुनीता पालांडे यांच्यासह कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते अमर शिवाजीराव चव्हाण, अमेरिकेतील उद्योजिका सौ स्नेहल आर्किले,विराज महाडिक, वसंतराव महाडिक,सौ साधना महाडिक, सौ रुपाली चव्हाण
यांनी परिश्रम घेतले.
वैशिष्टय म्हणजे या उपक्रमानंतर जुना राजवाडा परिसराची पुन्हा काटेकोर स्वच्छता करुन जुना राज वाडा आणि अंबाबाई मंदिर परिसराचे पवित्र्य जपण्यात आले.