Awaj India
Register
Breaking : bolt
आबाजी होणं सोपं नाही!अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*

जाहिरात

 

आबाजी होणं सोपं नाही!

schedule23 Oct 26 person by visibility 190 categoryराजकीय

 

सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी ते गोकुळ दूध संघाचे चेअरमन... हा प्रवास काही एका दिवसात झालेला नाही. यामागे आहेत तब्बल ४० वर्षांची मेहनत, अनुभव, माणसं जोडण्याची ताकद आणि दूध उत्पादकांचा विश्वास.

विश्वास नारायण पाटील म्हणजेच आपले आबाजी.

आबाजींच्या या प्रवासामागे त्यांच्या गुरुजनांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वर्गीय एस. आर. पाटील, स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब माने, गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर आणि स्वर्गीय आमशिकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनामुळे १९८६ साली आबाजींना गोकुळ दूध संघात संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

गुरुजनांनी दिलेली शिकवण आणि विचारांची शिदोरी घेऊन आबाजींनी गोकुळमधील आपला प्रवास सुरू केला. विशेषतः स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर साहेबांच्या विचारांच्या तालमीत तयार झालेल्या आबाजींनी चुयेकर साहेबांचे विचार आणि त्यांच्या कार्याची आठवण जपण्याचं काम कायम केलं.

पुढे जवळपास आठ वर्षे गोकुळ दूध संघाचे चेअरमन म्हणूनही आबाजींनी जबाबदारी सांभाळली.

गोकुळच्या या ४० वर्षांच्या प्रवासात जिल्ह्यातील अनेक मोठे नेते आणि कार्यकर्ते आबाजींच्या संपर्कात आले. महादेवराव महाडिक, स्वर्गीय पी. एन. पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह गोकुळशी जोडलेल्या अनेक नेत्यांबरोबर आबाजींनी काम केलं.

प्रत्येकाची राजकीय भूमिका वेगळी होती. मतभेदही झाले. राजकारणात हे होतच असतं. पण गोकुळमध्ये एकी राहावी, नेते आणि संचालकांमध्ये समन्वय राहावा आणि गोकुळचं काम पुढे जावं, यासाठी आबाजींनी कायम प्रयत्न केला.

दोन माणसांना एकत्र ठेवणंही सोपं नसतं. मग वेगवेगळ्या विचारांचे एवढे मोठे नेते आणि कार्यकर्ते एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणं किती अवघड असेल?

आबाजींची खरी ओळख फक्त राजकारणापुरती नाही.

गोकुळच्या प्राथमिक दूध संस्थांचे कर्मचारी, सचिव, दूध उत्पादक, अधिकारी आणि संचालक यांच्याशी त्यांचं वर्षानुवर्षांचं नातं आहे. प्राथमिक दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांना नावानिशी ओळखणारे आणि गावागावातील दूध उत्पादकांशी थेट संपर्क ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आबाजी.

गोकुळच्या माध्यमातून अनेक दूध उत्पादक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला. पशुपालनाला चालना मिळावी, शेतकऱ्यांच्या घरात दूध व्यवसायातून चार पैसे जास्त मिळावेत आणि पुढच्या पिढीलाही या व्यवसायात संधी मिळावी, यासाठी विविध उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिलं.

आज गोकुळ खूप मोठं झालं आहे. नवीन माणसं पुढे येणं गरजेचं आहेच. पण ज्यांनी चार दशके गोकुळ जवळून पाहिलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि अनेक पिढ्यांसोबत काम केलं, अशा अनुभवी माणसाचं मार्गदर्शनही महत्त्वाचं असतं.

आज निवडणुकीचा काळ आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. प्रत्येकजण आपापली बाजू मांडत आहे. राजकारणात हे होतच असतं.

पण आबाजींचा ४० वर्षांचा प्रवास केवळ आजच्या निवडणुकीपुरता पाहता येणार नाही.

गावाकडचा सर्वसामान्य दूध उत्पादक म्हणून सुरू झालेला प्रवास...

गोकुळच्या संचालकपदापर्यंत पोहोचला आणि पुढे गोकुळच्या चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.

या प्रवासात अनेक माणसं जोडली गेली, अनेक पिढ्या बदलल्या, राजकीय समीकरणं बदलली; पण गोकुळशी असलेलं नातं आणि दूध उत्पादकांशी असलेला संपर्क कायम राहिला.

चार दशकांचा हा प्रवास सहज झालेला नाही.

म्हणूनच मनापासून म्हणावंसं वाटतं...

आबाजी होणं सोपं नाही!

४० वर्षांचा प्रवास एका दिवसात तयार होत नाही...
आणि माणसांशी जपलेलं नातं एका निवडणुकीपुरतं मर्यादित नसतं.

— विनायक देसाई
सामाजिक कार्यकर्ते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes