Awaj India
Register
Breaking : bolt
सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळालवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीजथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायीनी तर केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मिता*विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून कोल्हापुरात एनडीए परीक्षेचे केंद्र सुरू करावे* डॉ. डी. वाय. पाटील यांनी गुणवत्तेची संस्कृती निर्माण केली*डॉ.झांबरे, प्रा.सौ.पाटील व डॉ.वाटेगांवकर यांच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंट*पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दीशिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली : राज ठाकरे

जाहिरात

 

सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्ताव

schedule24 Apr 26 person by visibility 440 categoryआरोग्य

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील माजगाव आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित दगडू पाटील हे शासकीय सेवेत कार्यरत असतानाच खासगी साखर कारखान्यात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करीत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
 जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले.
चौकशीदरम्यान डॉ. अमित पाटील यांनी स्वतःच खासगी कारखान्यात नोकरी करीत असल्याची कबुली दिली. कागदोपत्री तसेच प्रत्यक्ष तपासणीतही ते शासकीय सेवेत असतानाच खासगी नोकरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर त्यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच संबंधित पन्हाळा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असल्याची माहिती डॉ. पिंपळे यांनी दिली.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारे शासकीय सेवेत असतानाही खासगी व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्या डॉक्टरांची संख्या अधिक असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शासकीय दवाखान्यांमध्ये अपुरी उपस्थिती आणि खासगी ठिकाणी अधिक वेळ देणे, अशी तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा सर्व डॉक्टरांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
डॉ. अमित पाटील हे पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील रहिवासी असून, माजगाव उपकेंद्रात कार्यरत असतानाच त्यांनी खासगी साखर कारखान्यात काम केल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी व काही अधिकाऱ्यांनाही होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर संबंधित वृत्तवाहिनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes