Awaj India
Register
Breaking : bolt
*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफ

जाहिरात

 

*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*

schedule26 Sep 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

-हिरकणी मंचातर्फे आयोजन
 
कोल्हापूर
 
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या हिरकणी मंचातर्फे विद्यार्थिनींसाठी आयोजित पारंपरिक ‘गौराई खेळ’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. 
 
 पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि सौ. मधुरा नरके यांच्या हस्ते गणेश-गौरी पूजन व मंगलारतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी १०० हून अधिक विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत झिम्मा, फुगडी, घागर घुमवणे, काठवट-काना, सूप नाचवणे तसेच विविध गौरी गीते सादर करून गौराईचे पारंपरिक खेळ उत्साहात सादर केले.
 
झिम्मा स्पर्धेत सावित्री ग्रुपने प्रथम, सिव्हिल गर्ल्स ग्रुपने द्वितीय, तर राजमुद्रा ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना करवीर भूमी अभिलेख विभागातील श्रीमती संगीता पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि परीक्षक सुलोचना बागडी यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरकणी मंचाच्या प्रमुख प्रा. नीलम रणदिवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शीतल साळोखे, तसेच प्रा. ऐश्वर्या पाटील, सिद्धी जाधव, सुहासी साळोखे, नेहा माने, गायत्री आयरे यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
कसबा बावडा - गौराई स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करताना डॉ. महादेव नरके व मान्यवर.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes