*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसितगृहात विनामूल्य प्रवेश सुरु*
schedule14 May 25 person by visibility 96 category
कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): हातकणंगले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसितगृहामध्ये अनु जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग व अनाथ या प्रवर्गतील विद्यार्थ्यांना इयत्ता 4 थी पासून पुढील व्यवसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाकरीता विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश देण्याचेी प्रक्रिया सुरु असून इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, हातकणंगले या वसतिगृहास किंवा भ्रमध्वणी क्र. 9561148307 या द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
प्रवेशासाठी पूर्वी प्रमाणेच अर्ज विनामुल्य विद्यार्थ्यांना, पालकांना वितरीत करण्यात येत असून प्रवेश अर्जाची PDF प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळेचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम व क्रिडा साहित्य इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन दिल्या जातात, असेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसितगृहाच्या गृहपालांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.