Awaj India
Register
Breaking : bolt
*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरेभारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजनअध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणीकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहनगोकुळमध्ये प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना विरोध

जाहिरात

 

*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरे

schedule20 Nov 26 person by visibility 16 category

*
-जागतिक बायोएथिक्स दिनानिमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये मार्गदर्शन 
-कोल्हापूर - इंडिया बायोएथिक्स युनिटच्यावतीने आयोजन 

कोल्हापूर :
दैनंदिन जीवनातील छोट्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणल्यास व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आदर्श जीवनमूल्ये, नैतिक आचरण आणि चांगली जीवनशैली यांचा स्वीकार केल्यास केवळ वैयक्तिक जीवनच नव्हे, तर सामाजिक शांतता, राष्ट्रीय आनंद निर्देशांक आणि राष्ट्रउभारणीलाही हातभार लागतो, असे मत अश्विनी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, कोल्हापूरचे ज्येष्ठ शल्यचिकित्सक व मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. बी. आर. कोरे यांनी व्यक्त केले.

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर-इंडिया बायोएथिक्स युनिटच्यावतीने स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, कोल्हापूर येथे ‘जागतिक बायोएथिक्स दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘शांततेसाठी जैवनीतिशास्त्र’ या विषयावर  डॉ. कोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

डॉ. कोरे यांनी आदर्श जीवनमूल्ये आणि जैवनीतिशास्त्र यांचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केला. वैयक्तिक आरोग्य, सामाजिक जबाबदारी, नैतिक मूल्ये आणि शांततापूर्ण समाजनिर्मिती यांचा परस्परसंबंध त्यांनी अधोरेखित केला. 

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. 

कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. अर्चना सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अभिजीत मटकर यांच्यासह प्राध्यापक  व  विद्यार्थी उपस्थित होते. 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

शिवराज्याभिषेक २०२३ मोठ्या दिमाखात साजरा करणार ; युवराज छत्रपती संभाजीराजे.

schedule22 May 23 person by visibility 208 category

शिवभक्तांच्या उपस्थितीत घेतली बैठक..
 
पुणे. दि. २२
यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वे वर्ष सुरू होत आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील दि.६ जून हा एक महत्त्वाचा दिवस होता. हा दिवस सर्वच शिवभक्तांसाठी तितकाच महत्त्वाचा असल्याने, तसेच हा भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन असल्याने मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल. यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी केले.
६ जून २०२३ ते ६ जून २०२४ असे शिवराज्याभिषेकाचे वर्ष विविध लोकोपयोगी व ऐतिहासिक उपक्रमांनी साजरे केले जाईल. यासाठीच्या व्यापक नियोजनासाठी पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व शिवभक यांच्या उदंड उत्साहात ही बैठक संपन्न झाली. यावेळी युवराज संभाजी छत्रपती महाराज बोलत होते. बैठकीला महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.
युवराज संभाजी छत्रपती महाराज म्हणाले, ३५० वा शिवराज्याभिषेक दिन हा जगभर पोहोचेल आणि विश्ववंदनीय होईल यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. रायगड किल्ल्यास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. यावेळी त्यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून आत्तापर्यंत केलेल्या कामांचा आढावाही घेतला. बैठकीत पाणी, विद्युत पुरवठा, आपत्ति व्यवस्थापन, पार्किंग व शटल बस व्यवस्था, रोपवे, स्वच्छता, निवास व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन याची सविस्तर माहिती दिली.
              शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या प्रमुख मार्गदर्शिका आदरणीय युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी यावेळी सर्व महोत्सव व्यवस्थापन कमिटीच्या प्रमुखांकडून कामाचा आढावा घेतला. शिवभक्तांना शिवराज्याभिषेक महोत्सवात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत होते.
 
३५० सुवर्ण होणांचा होणार अभिषेक.
चंदुकाका सराफ यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन खास सोन्याचे ३५० सुवर्ण होण तयार केले असुन त्यांचा अभिषेक शिवमुर्तीवर करणेत येणार आहे. याबद्दल चंदुकाका सराफ पेढीचे आभार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांनी मानले.
          सर्वांचे स्वागत समिती सदस्य अतुल चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले. आभार कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी मानले.
सदरच्या बैठकीस कोल्हापूरहून विनायक फाळके, संजय पवार, उदय घोरपडे, अमर पाटील- सचिव, राहुल शिंदे, विश्वास निंबाळकर, करण गायकर (नाशिक), विनोद साबळे(रायगड) , धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे-पाटील(पुणे), देहू संस्थांनचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे महाराज, माणिक मोरे महाराज, रमेश पाळेकर (लोणावळा), हनुमंत काकडे(उस्मानाबाद), प्रशांत दरेकर(रायगड), आप्पासाहेब कुडेकर (संभाजीनगर), सत्यजित भोसले (मुंबई), प्रशांत शिवणकर , बा रायगड परिवाराच्या चैत्राली कारेकर, सतीश वेताळ पाटील (संभाजीनगर), गंगाधर काळकुटे (बीड), डॉ.गजानन देशमुख (अमरावती), वर्षा चास्कर, सत्यम सूर्यवंशी (करमाळा), राहुल पवार (करमाळा) आदी सदस्य व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes