Awaj India
Register
Breaking : bolt
गारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*गोकुळला सरदार पटेल डेअरी फेडरेशनमध्ये घेऊन संपवण्याचा महायुतीचा अजेंडा; सतेज पाटील यांचा घणाघातकौस्तुभ गावडे यांना राजकीय, शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्थांचा वाढता पाठिंबा!*दूध उत्पादकांनो भाकरी देणाऱ्या आनंदराव पाटील चुयेकरांना विसरणार काय? कौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा जाहीर पाठिंबा*शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कौस्तुभ गावडे कटिबद्ध; शिक्षक व पदवीधर प्रचारात भाजपाची साताऱ्यामध्ये मुसंडी अक्कलकोटमध्ये कौस्तुभ गावडे यांना वाढता प्रतिसाद राधानगरीत महायुतीला धक्का; किसन चौगुले समविचारी आघाडीतइस्पुर्ली पोलिसांची विशेष कामगिरी; ३.१५ लाखांचे १४ मोबाईल शोधून मालकांना परत

जाहिरात

 

गारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*

schedule11 Oct 26 person by visibility 35 categoryराजकीय

*शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेटी; शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवादावर भर*

मुदाळ : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने गारगोटी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी भेटीगाठी आणि संवादाचा सिलसिला सुरू आहे. विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि संस्थाचालक यांच्याशी संपर्क साधत शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न, अपेक्षा आणि भविष्यातील आव्हानांवर संवाद साधला.

याच अनुषंगाने आबिटकर नॉलेज सिटी (AKC) कॅम्पस, पाल, गारगोटीचे चेअरमन आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक मा. श्री. अर्जुन आबिटकर तसेच सदगुरू बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळ (KPIT Group), मुदाळचे कार्यवाहक तथा सचिव मा. श्री. विकासभैय्या कृष्णराव पाटील यांची कौस्तुभ गावडे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विक्रमसिंह आबिटकर, श्रीनिवास पाटील, दयानंद लोहार, आकाश पाटील, सचिन जाधव, सतीश गौड, कृष्णात पाटील, शिवाजी पाटील, नारायण जाधव, निवृत्ती गुरव, किशोर बर्गे, राजेंद्र व्हटकर, शहीद वीरपत्नी लक्ष्मी संकुल (SVLM Group) चे संचालक श्री. प्रशांत पालकर सर, उपप्राचार्य मा. श्री. सचिन लोहार, आनंद गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजसाहेब व्हरकट आणि सिद्धिविनायक आय. टी. आय. चे संस्थापक श्री. मनोज आळेकर तसेच विविध शिक्षक संघटनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या भेटीच्या निमित्ताने शैक्षणिक संस्थांचे कार्य, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न, शिक्षकांच्या अपेक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असलेले संस्थात्मक सहकार्य यांसह विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील घटकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवणे आणि त्यांच्या समस्या व अपेक्षा समजून घेणे, हा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील जनसंपर्काचा महत्त्वाचा भाग असल्याचे या भेटींमधून दिसून येते.

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक संस्थांसमोरील आव्हाने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना यांसारख्या विषयांना प्राधान्य देत कौस्तुभ गावडे यांचा विविध घटकांशी संवाद सुरू आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी होणाऱ्या या भेटीगाठींमुळे प्रचाराच्या अनुषंगाने संवादाचे व्यासपीठ निर्माण होत असून, शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याच्या भूमिकेतून कौस्तुभ गावडे यांचा जनसंपर्क सुरू असल्याचे चित्र आहे. पुणे विभागातील शिक्षकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर या संपर्क मोहिमेत भर दिला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes