दूध उत्पादकांनो भाकरी देणाऱ्या आनंदराव पाटील चुयेकरांना विसरणार काय?
schedule10 Oct 26 person by visibility 57 categoryशैक्षणिक
साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या चुयेकर साहेबांच्या स्मृतींना उजाळा; शशिकांत पाटील यांना चेअरमन करण्याचा निर्धार!
कोल्हापूर आवाज इंडिया :
जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांना शेतीला पूरक व्यवसाय उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे आनंदराव पाटील चुयेकर यांना दूध उत्पादक, ठराव धारक विसरणार काय? असा सवाल आज उपस्थित होत आहे. ज्या व्यक्तीने दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या योगदानाला विसरून चालणार नाही. मात्र, गोकुळच्या सत्तासंघर्षात चुयेकर कुटुंबाला चेअरमनपदापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याने दूध उत्पादकांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.
आनंदराव पाटील चुयेकर यांनी गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. दूध हा केवळ व्यवसाय न राहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार बनावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे असंख्य दूध उत्पादक कुटुंबांना जगण्याचा आधार मिळाला. त्यामुळे चुयेकर साहेबांचे योगदान केवळ गोकुळपुरते मर्यादित नसून ते जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेले आहे.
दूध दरवाढीसाठी परिवर्तन;
गोकुळच्या विकासासाठी प्रयत्न
गतवेळी गोकुळमध्ये परिवर्तन घडवून आणताना आमदार सतेज पाटील यांनी दूध उत्पादकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा, या भूमिकेतून त्यांनी प्रयत्न केले. परिवर्तनानंतर दूध उत्पादकांना प्रतिलिटर १४ रुपयांची दरवाढ दिली. त्याचबरोबर गोकुळ स्वावलंबी व्हावे आणि दूध उत्पादकांना अधिक लाभ मिळावा, यासाठी विविध प्रकल्प उभारण्यावरही भर देण्यात आला. आत्तासुद्धा दुधाला दर वाढ पाच रुपये पेक्षा अधिक करून पशुखाद्याचे घर कमी करणार असल्याचे सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी सांगितले
गोकुळच्या विकासाबरोबरच दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण गोकुळची खरी ताकद ही सत्ताधारी नेत्यांमध्ये नसून दूध संकलनासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या लाखो दूध उत्पादकांमध्ये आहे.
चुयेकर साहेबांच्या मुलाला चेअरमन करण्याचा शब्द का पाळला नाही?
गोकुळच्या सत्ताकारणात आनंदराव पाटील चुयेकर यांच्या योगदानाला साजेसे स्थान मिळावे, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटच्या वर्षात चुयेकर कुटुंबातील शशिकांत पाटील यांना चेअरमनपदाची संधी द्यावी, अशी भूमिका होती. मात्र, शशिकांत पाटील यांना या पदावर संधी मिळू नये, यासाठी महायुतीतील काही नेत्यांनी प्रयत्न केला.
आयुष्यभर योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला योग्य सन्मान मिळत नसेल, तर त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्याचा अर्थ काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दूध उत्पादकांना भाकरी मिळवून देणाऱ्या व्यक्तीच्या स्मृतीचा सन्मान हा केवळ भाषणांतून नव्हे, तर कृतीतून झाला पाहिजे, अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
चुयेकर साहेबांच्या गावातून प्रचाराचा नारळ; शशिकांत पाटील यांना चेअरमन करण्याचा निर्धार!
दूध उत्पादक आनंदराव पाटील चुयेकर यांचे योगदान विसरलेले नाही, हे दाखवून देण्यासाठी यंदाच्या गोकुळ निवडणुकीत त्यांच्या मुलाला, शशिकांत पाटील यांना चेअरमन करण्याचा निर्धार समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या चुये या गावातूनच प्रचाराचा नारळ फोडून चुयेकर साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.
रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी चुयेकर साहेबांच्या गावात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. हा केवळ निवडणूक प्रचाराचा प्रारंभ नसून दूध उत्पादकांच्या योगदानाची आठवण करून देणारा आणि चुयेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या निर्धाराचा संदेश असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
गोकुळच्या निवडणुकीत चेअरमनपदाचा निर्णय हा केवळ राजकीय गणितांवर होणार की दूध उत्पादकांच्या भावना आणि योगदानाचाही विचार केला जाणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आता दूध उत्पादक ठरावधारकांनी ठरवायचे!
आनंदराव पाटील चुयेकर यांनी दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण ठेवायची की राजकीय सत्तासंघर्षात त्यांचे योगदान विसरून जायचे, हा प्रश्न आज गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
चुयेकर साहेबांच्या कार्याचा सन्मान व्हावा, त्यांच्या कुटुंबाला योग्य संधी मिळावी आणि शशिकांत पाटील यांना गोकुळचे चेअरमन करण्याचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी समर्थकांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दूध उत्पादकांना भाकरी देणाऱ्या आनंदराव पाटील चुयेकरांना विसरणार काय? हा केवळ प्रश्न नाही, तर गोकुळच्या राजकारणाला विचार करायला लावणारा सवाल आहे!