Awaj India
Register
Breaking : bolt
इस्पुर्ली पोलिसांची विशेष कामगिरी; ३.१५ लाखांचे १४ मोबाईल शोधून मालकांना परतदुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत कौस्तुभ गावडे यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखलपुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या नावाची चर्चा; शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी.भविष्यात गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरेकोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रमडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायम

जाहिरात

 

इस्पुर्ली पोलिसांची विशेष कामगिरी; ३.१५ लाखांचे १४ मोबाईल शोधून मालकांना परत

schedule07 Oct 26 person by visibility 161 categoryगुन्हे

आवाज इंडिया प्रतिनिधी 
चुये : गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार इस्पुर्ली पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे १४ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले.
अपर पोलीस अधीक्षक (कोल्हापूर) तसेच करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल कांबळे यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून गहाळ मोबाईलचा माग काढला.
मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कांबळे तसेच इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या संपूर्ण पथकाचे आभार मानले.
गहाळ मोबाईल शोधण्याच्या या तत्पर कारवाईबद्दल इस्पुर्ली पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes