Awaj India
Register
Breaking : bolt
के. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्तावमधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी ४ मे पूर्वी नामांकने सादर करावीत* आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमा

जाहिरात

 

के. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....

schedule28 Apr 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक

के. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि 
संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....
कोल्हापूर महानगरपालिकेचे  
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.) कॉलेज, कोल्हापूर  येथे 
ग्रंथालय विभाग, भूगोल विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष  यांचे वतीने "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना” हे डॉ. युवराज मोटे  डॉ. भरत पाटील  कॅप्टन डॉ. अमित रेडेकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. बाबासो उलपे, भरत बुटाले व गंगाधर दिवेकर यांचे हस्ते संपन्न झाले. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने साजरे केले जाणारे आंतरराष्ट्रीय दिन महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.बी एन उलपे यांनी केले. भू पर्यावरण दिन हे जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचे आहेत असे मत भरत बुटाले यांनी व्यक्त केले. यश प्रिंटर्सचे गंगाधर दिवेकर यांनी पर्यावरणीय संवर्धनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना उपयुक्त हे पुस्तक आहे असा विचार व्यक्त केला.  डॉ. अमित रेडेकर यांनी
 भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना या पुस्तकाबद्दल भूमिका स्पष्ट केली. प्रविण साळुंखे ज्ञानज्योत प्रकाशन, पुणे यांचे वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल आर आर मांगले, डॉ. संजय कांबळे व डॉ. जे एम शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर आर मांगले यांनी केले तर  आभार डॉ संजय कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. युवराज मोटे यांनी केले.या कार्यक्रमासाठी डॉ. रामेश्वर कांबळे व महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes