Awaj India
Register
Breaking : bolt
चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे* *दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये*

जाहिरात

 

​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

schedule07 May 26 person by visibility 143 category

 

कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढल्याने आणि त्यातून होणाऱ्या गंभीर अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबवून अल्पवयीन मुलांच्या १५ पालकांवर किंवा वाहन मालकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांची वाहने जप्त केली आहेत.

अशी झाली कारवाई

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने:

  • शाहूपुरी पोलीस ठाणे: ०८ गुन्हे

 

  • लक्ष्मिपुरी पोलीस ठाणे: ०३ गुन्हे

 

  • राजारामपुरी पोलीस ठाणे: ०३ गुन्हे

 

  • जुना राजवाडा पोलीस ठाणे: ०१ गुन्हा

 

​एकूण १५ गुन्हे दाखल करून मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ मधील कलम १९९ (अ) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

पालकांनो सावधान! काय होऊ शकते शिक्षा?

अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी दिल्यास पालकांना आणि संबंधित मुलाला खालील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल:

  • तुरुंगवास व दंड: पालकांना किंवा वाहन मालकाला ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २५,००० रुपये दंड होऊ शकतो.

 

  • आरसी रद्द: ज्या वाहनाचा वापर मुलाने केला, त्या वाहनाचे रजिस्ट्रेशन (RC) १२ महिन्यांसाठी रद्द केले जाते.

 

  • बाल न्याय कायदा: संबंधित मुलावर बाल न्याय कायद्यांतर्गत खटला चालवला जातो.

 

  • लायसन्सवर बंदी: तो मुलगा वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अपात्र ठरतो.

 

पोलिसांचे आवाहन

अल्पवयीन मुलांना कायद्याचे ज्ञान नसते, ज्यामुळे ते स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू शकतात. शाळांमध्ये जाऊन प्रबोधन करूनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने ही मोहीम आता अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. तरी नागरिकांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्या पाल्यांना दुचाकी चालवण्यास देऊ नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes