Awaj India
Register
Breaking : bolt
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या नावाची चर्चा; शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी.भविष्यात गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरेकोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रमडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायममंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

जाहिरात

 

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी.

schedule02 Oct 26 person by visibility 83 category

 

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे आवाहन

ऐतवडे बुद्रुक : सद्य परिस्थितीत शिक्षणात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी पुणे विधान परिषद शिक्षक मतदार संघातील तरुण व तडफदार उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना विजयी करावे असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
     कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका झंजावती प्रचार दौऱ्यानिमित्त प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ऐतवडे बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संकुलात शिक्षक मतदारांना आवाहन केले.
    पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार  कौस्तुभ गावडे  यांच्या प्रचारार्थ वाळवा तालुक्यातील प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांनी गुरुदेव कार्यकर्त्यांसमवेत शाळांमध्ये भेटी देऊन शिक्षक मतदारांशी संवाद साधला.
    कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे साहेब यांनी प्रथम कुरळप या ठिकाणी साखर संघाचे  माजी अध्यक्ष पी. आर. पाटील दादा यांच्या घरी भेट दिली. ऐतवडे बुद्रुक येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या वास्तव्य असणाऱ्या पाटील वाड्याला भेट दिली. त्यानंतर ऐतवडे खुर्द येथे डॉ. प्रकाश पाटील यांच्या शैक्षणिक संकुलाला भेट दिली त्यानंतर चिकुर्डे, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी व कासेगाव एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर या ठिकाणच्या विविध शाखांना भेटी दिल्या.
     यावेळी तालुका प्रचार प्रमुख प्राचार्य उमेश जाधव यांनी प्राचार्य अभयकुमार साळुंखे व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तासगावचे प्राचार्य सुरेश पाटील, माजी सहसचिव पी. एस. चव्हाण, माजी विभाग प्रमुख प्रकाश हाके, प्राचार्य व्ही. एच. पाटील, माणिक वांगीकर, माजी मुख्याध्यापक दिलीप चरणे, माजी आजीव सेवक बेडगे सर, बी. एन. माळी, प्रा. अविनाश पाटील, मुख्याध्यापक डी. आर. पाटील,  मुख्याध्यापक संजय शिंदे, मुख्याध्यापिका रंजना पाटील, शैल्य चव्हाण, मुकेश पाटील, प्रा. अमोल सोनवणे, वलांडकर सर, रंजीत कुंभार, उल्हास पाटील, अश्रफ जमादार, एम. के. खतीब, इम्रान मुलानी, युवराज कदम, कुणाल जाधव हे सहभागी होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes