Awaj India
Register
Breaking : bolt
आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायममंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्धशिक्षकहिताचा मुद्दा केंद्रस्थानी; कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद

जाहिरात

 

शिक्षकहिताचा मुद्दा केंद्रस्थानी; कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ

schedule28 Sep 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

आवाज इंडिया 
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळी हा प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या शुभहस्ते प्रचाराचा शुभारंभ झाला.
या प्रसंगी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कौस्तुभ गावडे यांच्या शिक्षकहिताच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त केला. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करणे, या मुद्द्यांना गावडे यांच्या प्रचारात प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी थेट संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम सुरू असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. शिक्षक मतदारांच्या नोंदणीचे नियोजन, शिक्षकांशी सातत्याने संपर्क आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर केलेला पाठपुरावा या माध्यमातून गावडे यांनी शिक्षकांशी संवाद वाढविला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिक्षकांच्या वेतन, सेवा अटी, पदोन्नती, शैक्षणिक कामकाजातील अडचणी, विविध शासकीय निर्णयांची अंमलबजावणी तसेच शिक्षकांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची भूमिका प्रचाराच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिक्षकांच्या समस्या केवळ निवडणुकीपुरत्या न राहता त्या सातत्याने संबंधित यंत्रणेकडे मांडून त्यावर पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी अधोरेखित केले.
प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोकराव जगताप, विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, प्राचार्या डॉ. श्रृती जोशी, प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, डॉ. कविता तिवडे, डॉ. आर. वाय. पाटील, हितेंद्र साळुंखे, महेश साळुंखे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व नेते, गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय व कार्यालयीन कर्मचारी तसेच महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळी प्रचाराचा शुभारंभ झाल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित संस्थेच्या परिसरातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रचाराची सुरुवात झाल्याने उपस्थित शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, आगामी काळात पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर देण्यात येणार असून, शिक्षकांच्या अपेक्षा आणि प्रश्न समजून घेऊन त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes