Awaj India
Register
Breaking : bolt
*कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न**डी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा* *'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना* *’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कार* -*डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये* *'वूमन इन लीडरशिप' कार्यक्रम उत्साहात*सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल जाधव यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरशिये येथील राजश्री सातपुते यांना 'जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीरसहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल निता रेपे यांना 'आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार' जाहीर

जाहिरात

 

*कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*

schedule28 Mar 26 person by visibility 25 categoryगुन्हे

कोल्हापूर, दि. २७ मार्च २०२६: कडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक विक्री होत असल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सिव्हील सर्जन कार्यालय कोल्हापूर,अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी (FSO) श्री. विजय पाचपुते तसेच कडोली पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. आर. ए. पाटील व ग्उपजिल्हा रुग्णालय कडोली च्या दंतचिकित्सक डॉ भूमिका फतेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कडोली बस स्थानक, उपजिल्हा रुग्णालय व परिसरातील विविध ठिकाणी तपासणी केली.
सदर मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, साठवणूक व वापर आढळून आल्याने एकूण १३ जणांवर सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार नियमन) अधिनियम २००३ (COTPA Act 2003) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण ₹२,६००/- इतका दंड वसूल करण्यात आला.
कारवाईदरम्यान संबंधितांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन व विक्रीबाबत कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
“*तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अशा संयुक्त धडक मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, नागरिकांनीही कायद्याचे पालन करून व्यसन,तंबाखू मुक्त समाज करणे कामी प्रशासनाला सहकार्य करावे.”*-डॉ व्ही ए आरळेकर (जिल्हा सल्लागार (एनटीसीपी) जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालय कोल्हापूर)
 
सदर कारवाईमुळे परिसरातील प्रतिबंधित गुटखा, सुगंधी पान मसाला अवैध साठवणूक व घाऊक 
विक्रीवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहेत.
सदर धडक कारवाई मोहिमी कामी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रशांत वाडीकर, अन्न व औषध प्रशासन चे श्री शिर्के आणि कडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री कोडग यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes